मौजमजेसाठी वाहनचोरी करणारा आरोपी जेरबंद
पुणे, लोहगाव (प्रतिनिधी):
पुणे शहरातील लोहगाव परिसरात मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल दोन लाख रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
लोहगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी रात्री १०.३० ते ६ एप्रिल सकाळी ८.०० या कालावधीत घडलेल्या दुचाकी चोरीच्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनीषा पाटील यांनी तपास पथकाला दिले होते.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीची ओळख साहिल सोनिया सियान (वय २८, रा. साई पार्क, खंडोबा माळ, लोहगाव) अशी पटली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गुरुद्वारा परिसरात चोरीच्या दुचाकीसह फिरत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.
पोलिस चौकशीत आरोपीने आणखी एक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून
एमएच १२ पीआर ६२७४
टीएन ३० एयु ५४५०
अशा एकूण दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत अंदाजे २ लाख रुपये आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.
विशेष: आरोपी हा केवळ मौजमजेसाठी वाहन चोरी करत असल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे.

संपादक : नागेश देडे





