उद्योगक्राईम

चारित्र्यावर संशय… नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पत्नीनं पतीचा गळा घोटला!


पिंपरी-चिंचवड (पुणे):

मध्यरात्रीच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमध्ये थरकाप उडवणारी घटना घडली आहे. नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या चैताली भोईर हिने आपल्या पतीचा नकुल भोईर वय ४० ओढणीने गळा घोटून खून केला. चारित्र्यावर संशय या कारणावरून सुरू झालेला घरगुती वाद अखेर रक्तरंजित वळणावर गेला. नकुल भोईर हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. चैताली भोईर स्थानिक राजकारणात सक्रीय असून, आगामी निवडणुकीत नगरसेवक पदासाठी तयारी करत होती. मात्र, तिच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर आणि व्यक्तिमत्त्वावर पती नकुल यांना संशय वाटत असल्याने घरात सतत वाद व्हायचा.

गुरुवारी मध्यरात्री पुन्हा वाद पेटला आणि रागाच्या भरात चैतालीने ओढणीने पतीचा गळा आवळून ठार मारले. त्या वेळी त्यांच्या दोन लहान मुलं—वय वर्षे ५ आणि २—घरात झोपलेली होती.

शेजाऱ्यांनी आवाज ऐकून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चैतालीला अटक केली आहे. शव ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही घटना संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ माजवणारी ठरली आहे.

एका गृहकलहातून राजकीय स्वप्नांची इमारत क्षणार्धात उद्ध्वस्त झाली…

 

 


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *