सौ. मीनाताई माने इंगुळकर यांच्या वाढदिवसानिमित्तस्व. सी. आर. रंगनाथन कर्णबधिर विद्यालय, टिंगरेनगर येथे मुलांना खाऊ वाटप
पुणे प्रतिनिधी:-सामाजिक बांधिलकी आणि समाजोपयोगी कार्याचा वारसा जपत सौ. मीनाताई माने इंगुळकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्व. सी. आर. रंगनाथन कर्णबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरले.
कार्यक्रमास लिंगु साखरे, विनोद वैरागर तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी मीनाताई माने इंगुळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
शाळा प्रशासनानेही या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी असा आनंददायी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल उपस्थित सर्वांचे आभार मानले.
विशेष मुलांपर्यंत आनंद पोहोचवण्याचा आणि समाजात सकारात्मक संदेश देण्याचा हा उपक्रम स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात कौतुकास्पद ठरला.

संपादक : नागेश देडे





