पुणे शहरातील काही भागात पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहणार
पुणे शहरातील काही भागात पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहणार
रावेत उपसा केंद्रातून पुणे शहरास पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी बाजूला हलविण्याचे काम सुरु असल्याने पुणे महापालिकेने नागरिकांना महत्त्वाची माहिती दिली आहे.
याअंतर्गत:
दिनांक 21 जानेवारी 2026 (बुधवार): पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.
दिनांक 22 जानेवारी 2026 (गुरुवार): पाणीपुरवठा उशिरा व कमी दाबाने होणार आहे.
प्रभावित क्षेत्रे:
कळस, माळवाडी, जाधव वस्ती, गणेशनगर, बोपखेल, विश्रांतवाडी, अंशतः मस्के वस्ती, संजय पार्क, बर्मा शेल, विमानतळ परिसर आणि सभोवतालचे भाग.
पुणे महापालिका नागरिकांना विनंती करते की या दिवसांमध्ये पाणीपुरवठा मर्यादित राहणार असल्याचे लक्षात घेऊन आवश्यक ती पूर्वतयारी करून सहकार्य करावे.

संपादक : नागेश देडे





