उद्योग

प्रभाग क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांचा घरोघरी प्रचार; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन मध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार हर्षल टिंगरे, सुहास टिंगरे, नंदिनी धेंडे आणि शितल सावंत
यांनी घरोघरी जाऊन थेट जनसंपर्क साधत प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.
प्रभागातील प्रत्येक वस्ती, गल्लीत जाऊन उमेदवारांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत
त्यांच्या दैनंदिन अडचणी, प्रश्न आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
या वेळी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची समस्या, खराब रस्ते, ड्रेनेज व सांडपाणी, कचरा व्यवस्थापन,
आरोग्य सुविधा, शासकीय योजनांचा लाभ, महिला सुरक्षेचे प्रश्न तसेच युवकांच्या रोजगाराचा मुद्दा
उमेदवारांसमोर मांडला.
उमेदवारांनी नागरिकांना आश्वस्त करत सांगितले की,
निवडून आल्यानंतर प्रभागातील मूलभूत सुविधा सक्षम करणे, रखडलेली विकासकामे पूर्ण करणे,
पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार देणे हे आमचे प्रमुख ध्येय राहील.
जनतेच्या विश्वासावर खरे उतरून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
घरोघरी प्रचार करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या धोरणांची माहिती देत
सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे राजकारण
ही पक्षाची भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली.
या प्रचार मोहिमेदरम्यान स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने
प्रभाग क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांविषयी
उत्साहाचे व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
थेट संवाद, लोकांशी नाळ जोडणारा प्रचार आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार प्रभाग क्रमांक दोनमध्ये
मजबूत दावेदार म्हणून पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *