उद्योग

वडिलोपार्जित मालमत्तेतून अन्याय्य वागणूक; बहिणीची पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी


पुणे : कर्वेनगर येथील श्रीमती कविता प्रकार मानकर यांनी आपल्या वडिलोपार्जित संपत्तीबाबत झालेल्या अन्यायाविरोधात गंभीर आरोप करत पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मानकर गेली ४० वर्षे कर्वेनगर येथील लेन नं. ६ मधील घर नंबर ३८ येथे राहत असून, या काळात त्यांनी अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे.

भाऊकडून २०१४ मध्ये घर बांधण्यासाठी सह्या घेण्याची विनंती

२०१४ मध्ये कविता मानकर यांच्या भावाने — श्री. मिलींद शंकर पठारे, रा. गणेश कॉलनी, कोथरूड — वडिलोपार्जित मातीचे घर बांधण्याच्या कारणावरून बहिणींच्या सह्या घेतल्या. त्यावेळी २ बहिणी आणि १ भाऊ असे तिघेही या मालमत्तेचे कायदेशीर वारसदार होते. कौटुंबिक नाते तुटू नये, वाद वाढू नयेत म्हणून कविता यांनी स्वखुशीने हक्कसोड करण्यास तयार होत १४ नोव्हेंबर २०१९ रोजी हक्कसोड पत्र तयार करण्यात आले.

भावाने ‘कायद्याप्रमाणे योग्य मोबदला देण्याचे’ लेखी आश्वासन देखील दिले होते, असे मानकर यांनी सांगितले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मोबदल्यासंबंधित प्रक्रिया पूर्ण झाली होती.

पाच वर्षे भावाच्या ओशरीवर राहिल्यानंतर त्रास वाढला

कविता मानकर यांनी सांगितले की, “मी पाच वर्षे त्यांच्या ओशरीवर राहिले. परंतु त्यांचा सततचा त्रास आणि अपमान सहन न झाल्याने मला कायदेशीर मार्ग अवलंबण्याची वेळ आली.”

त्याशिवाय, त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. कठीण परिस्थितीत त्यांनी आपल्या नवऱ्याला आजारातून वाचवू शकले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, या सर्व काळात त्यांच्या भावाकडून आणि संबंधित व्यक्तीकडून माणुसकीची अपेक्षा ठेवूनही त्यांची घोर फसवणूक झाली.

वारसदारांच्या नावांची फेरफार करून ‘अनधिकृत कट’ केल्याचा आरोप

मानकर यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, संपत्तीशी संबंधित दस्तऐवजांमध्ये फेरफार करत त्यांच्या वारसदारांच्या नावांचा अनधिकृतपणे कट करण्यात आला. त्यांना कोणतीही माहिती न देता ही कारवाई केली गेली, असा त्यांचा दावा आहे.

कोर्ट-कचेरीची क्षमता नाही; थेट पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी

आर्थिक अडचणीमुळे कोर्ट-कचेरीचे लांब आणि खर्चिक लढे लढण्याची माझी क्षमता नसल्याने, मी थेट पोलिस महोदयांकडे न्याय मागते, असे मानकर यांनी पत्रातून कळकळीने आवाहन केले.

त्यांनी मागणी केली आहे की संबंधित दोन व्यक्तींवर खालील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा:

भा.द.वि. 120(B) – गुन्ह्याची कटकारस्थान

भा.द.वि. 467 – कागदपत्रांची बनावटगिरी

भा.द.वि. 468 – फसवणुकीसाठी बनावट कागदपत्र

भा.द.वि. 441 – अतिक्रमण

भा.द.वि. 506(2) – गंभीर गुन्ह्याची धमकी

भा.द.वि. 420 – फसवणूक

कविता मानकर यांनी पोलिसांकडे विनंती करत सांगितले की, “माझ्याशी झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा, एवढीच अपेक्षा आहे.”


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *