उद्योगताज्या घडामोडी

विश्रांतवाडी चौपाटी परिसरात बेकायदेशीर जाहिरात कमान उभारली!


पुणे – विश्रांतवाडी चौपाटी परिसरात परवानगी न घेता रस्त्याच्या मधोमध जाहिरातीसाठी कमान उभारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बेकायदेशीर बांधकामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेला तक्रार करून ही कमान तात्काळ काढून टाकावी आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

महानगरपालिकेच्या नियमानुसार, सार्वजनिक रस्त्यांवर किंवा चौकांमध्ये जाहिरातीसाठी कमान उभारण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असते. मात्र, नियम धाब्यावर बसवून केलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांची मागणी :

तात्काळ तपास करून कमान हटवावी जबाबदारांवर दंडात्मक कारवाई करावी

अशा प्रकारच्या बेकायदेशीर जाहिरातींवर कायमस्वरूपी नियंत्रण आणावे

 


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *