उद्योग

पोरवाल पार्क परिसरात मोठी दुर्घटना टळली; बांधकामादरम्यान भिंत कोसळली, नागरिकांचा संताप


पुणे (प्रतिनिधी):

पुण्यातील येरवडा येथील पोरवाल पार्क परिसरात सुरु असलेल्या नव्या इमारतीच्या बांधकामादरम्यान आज एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. जोरदार वाऱ्यामुळे इमारतीच्या सावे मजल्यावर उभारलेली भिंत अचानक कोसळली. या घटनेच्या वेळी खाली काही लहान मुले खेळत असल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही घटना बिल्डरच्या निष्काळजीपणाचे उत्तम उदाहरण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे वडगाव शेरी उपाध्यक्ष सचिन भोसले यांनी तात्काळ व स्थानिक नागरीक करण चौहान, विजय स्वामी ओमकार तुजारे,अक्षय कागडा, अक्षय सुतार.सनी राव,नंदू राक्षे,उवेश मन्सूरी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली. त्यांनी संबंधित बांधकामावर नाराजी व्यक्त करत म्हटले की, “बांधकाम नियमांचा सर्रास भंग केला जातोय. कामगार आणि नागरिकांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे. प्रशासनाने यावर तात्काळ चौकशी करून जबाबदार बिल्डरवर कडक कारवाई करावी.”

स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, या इमारतीच्या परिसरात मागील काही दिवसांपासून सुरक्षेची कोणतीही सोय नाही. बांधकाम परिसरात सुरक्षा जाळी, बॅरिकेड्स किंवा सूचनाफलक नाहीत. त्यामुळे दररोज जाणारे नागरिक आणि लहान मुले मोठ्या धोक्यात आहेत.

या घटनेनंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले असून, त्यांनी बांधकाम तात्काळ थांबवून बांधकाम विभाग, महापालिका आणि कामगार विभागाकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

नागरिकांचे म्हणणे

आज मुलांना काही झाले असते तर कोण जबाबदार राहिले असते? प्रशासनाने आधीच अशा निष्काळजी बांधकामांवर नियंत्रण ठेवायला हवे,असे स्थानिक रहिवासी म्हणाले.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *