उद्योगसामाजिक

भिमनगरमध्ये जीवन ज्योती प्रतिष्ठानतर्फे ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’चा प्रेरणादायी उपक्रम


भिमनगर परिसरात जीवन ज्योती प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रदूषणमुक्त दिवाळी आनंदाने, पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करूया हा संदेश देण्यासाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश समाजात पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे व लहान मुलांच्या माध्यमातून प्रदूषणमुक्त सण साजरा करण्याचे महत्त्व पटवून देणे हा होता.

प्रतिष्ठानचे संस्थापक जितेंद्र कराळेकर यांनी या निमित्ताने सांगितले की

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे. फटाके फोडून धूर, आवाज आणि प्रदूषण निर्माण करण्याऐवजी आपण निसर्गाशी सुसंवाद साधणारी, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी केली पाहिजे. हे संस्कार लहान वयातच मुलांमध्ये रुजवणे हे आमचे ध्येय आहे.”

या उपक्रमात भिमनगरमधील अनेक लहान मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यांना टिकल्या, बंदुका आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. मिठाई घेताना आणि खेळण्यांशी आनंद व्यक्त करताना मुलांच्या चेहऱ्यावर उत्सवाची झळाळी आणि समाधान दिसत होते.

या प्रसंगी छायाताई सोनवणे, नीलम तामचीकर, विनोद गायकवाड, नागेश देडे, जालिंदर उकरडे, रमेश चव्हाण, गोविंद म्हस्के, दीपक गायकवाड आदी प्रतिष्ठानचे सदस्य तसेच भिमनगरमधील नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रतिष्ठानचे सदस्य आणि मुलांनी एकत्र येऊन दिवे लावले आणि स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त दिवाळी आपली जबाबदारी असा संदेश देत परिसर उजळवला.

जीवन ज्योती प्रतिष्ठानने गेल्या काही वर्षांपासून सामाजिक उपक्रमांद्वारे पर्यावरण संरक्षण, शिक्षण, आरोग्य आणि समाजहितासाठी सतत कार्य केले आहे. या वर्षीचा प्रदूषणमुक्त दिवाळी उपक्रम हा त्याच कार्याची एक प्रेरणादायी झलक ठरला आहे.

प्रकाश पसरवूया पण धूर नाही.आनंद वाटूया पण आवाज नाही.

भिमनगरमधील हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला असून परिसरात सामाजिक जाणिवेचा आणि पर्यावरणप्रेमाचा सुगंध दरवळला आहे.

 

 

 


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *