उद्योग

विश्रांतवाडीत पुन्हा नव्याने उजळली “धम्मपहाट”


पुणे विश्रांतवाडी : जीवनज्योती प्रतिष्ठान व समता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र परिवर्तन दिन व अशोक विजयादशमी दिनानिमित्त भव्य मंगलमय धम्मपहाट व महा बुद्ध वंदना कार्यक्रमाचे आयोजन भीमनगर, धानोरी रोड, विश्रांतवाडी येथे करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली. महाराष्ट्राचे ख्यातनाम बुद्ध-भीम गीत गायक समर्थक दिनकर शिंदे यांनी त्यांच्या प्रबोधनात्मक गीतांनी वातावरण भारावून टाकले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद गायकवाड होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “विखुरलेला समाज एकत्र आणून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे आहे. तसेच धम्म सहलीचे आयोजन, वाचनालये आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू केल्या पाहिजेत.”

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र कराळेकर, धनंजय जाधव, अंबादास उजगरे, रमेश चव्हाण, गोविंद म्हस्के, राहुल भोसले, नानाभाऊ सोनवणे, दिपक गायकवाड, जितेंद्र जगताप, सायबू चव्हाण, कांता राऊत, सविता बाराथे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पारडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन छायाताई सोनवणे यांनी मानले.

 

 


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *