ABOUT USक्राईम

रामटेकडी परिसरात पोलिसांची कडक भूमिका — “उद्या सूर्योदयापूर्वी सर्व अवैध धंदे थांबवा, नाहीतर खाकी भाषेत उत्तर मिळेल!”


पुणे | वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नव्याने उभारलेल्या रामटेकडी पोलीस चौकीचे भव्य उद्घाटन आज पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते पार पडले. या वेळी उपआयुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक नागरिक, समाजसेवक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनानंतर नागरिकांशी संवाद साधताना आयुक्त कुमार यांनी परिसरातील अवैध धंद्यांविरुद्ध कडक आणि निर्णायक भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला —

रामटेकडी आणि वानवडी परिसरातील अवैध दारू, गांजा आणि ड्रग्स विक्री करणाऱ्यांनी सहा तासांच्या आत म्हणजे उद्या सूर्योदयापूर्वी आपले धंदे बंद करावेत. अन्यथा पोलिसांकडून ‘खाकी भाषेत’ मनपरिवर्तन केले जाईल.”»

आयुक्तांनी अधिकृत परवानाधारक दुकानदारांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. तसेच नागरिकांना विनंती केली की, अवैध व्यवहारांची माहिती तात्काळ पोलीस चौकीला किंवा वानवडी पोलिसांना कळवावी, जेणेकरून तत्काळ कारवाई करता येईल.

या वेळी आयुक्तांनी ठाणेदार आणि क्राईम ब्रांचला स्पष्ट निर्देश दिले की

या भागात अवैध धंदे 100 टक्के बंद करायचेच आहेत. कोणतीही तडजोड चालणार नाही.”

स्थानिक रहिवाशांनी आणि व्यापाऱ्यांनी या कठोर भूमिकेचे स्वागत केले असून, पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढवण्यासाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी रामटेकडी चौकीची स्थापना महत्त्वाची पायरी ठरली आहे. येत्या काही दिवसांत चौकीमार्फत नियमित गस्त, नागरिकांशी थेट संवाद आणि अवैध धंद्यांवर छापे अशी मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *