जुन्या वादातून युवकाचा निर्घृण खून; विश्रांतवाडी परिसर हादरला
पुणे, दि. १५ एप्रिल २०२६ – विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास एका १८ वर्षीय युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा हडपसर येथील १८ वर्षीय युवक आहे. या प्रकरणी अनोळखी तीन आरोपी व त्यांचे ४ ते ५ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
दि. १५ एप्रिल रोजी रात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास, कॉमरझोन समोरील एअरपोर्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर, पंचशीलनगर, येरवडा येथे ही घटना घडली.
मृत युवकाचे नाव गौरव गणेश तेलंगी (वय १८ वर्षे ६ महिने) असे असून तो दिनकर वस्ती, नवले हॉस्पिटलजवळ, न-हे येथे राहत होता.
जुन्या वादातून हल्ला प्राथमिक तपासात समोर आले आहे की, आरोपींनी जुन्या भांडणाच्या रागातून गौरव याच्यावर धारदार शस्त्राने तसेच सिमेंटच्या विटांनी हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. गुन्हा दाखल या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (२), १८९ (२)(४)(५), १९१ (२)(३), १९० तसेच आर्म अॅक्ट कलम ४(२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(अ), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

संपादक : नागेश देडे





