सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त धनंजयभाऊ जाधव फाऊंडेशनतर्फे अभिवादन


 विश्रांतवाडी | प्रतिनिधी

भारताचे महान सामाजिक क्रांतिकारक, संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धनंजयभाऊ जाधव फाऊंडेशनच्या कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यानंतर भीमनगर, विश्रांतवाडी, श्रमिकनगर, धानोरी व लोहगाव परिसरातील विविध बुद्ध विहारांना भेट देऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रत्येक बुद्ध विहारामध्ये बुद्ध वंदना, धम्म वंदना तसेच भारताच्या संविधानाची प्रस्ताविका भेट स्वरूपात देण्यात आली समता, बंधुता आणि न्याय” या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीचा संदेश देणाऱ्या बाबासाहेबांना कृतज्ञतापूर्वक नमन करत, “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या त्यांच्या विचारांना सन्मान अर्पण करण्यात आला.

या उपक्रमादरम्यान समाज बांधवांशी संवाद साधून सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास प्रणय शेंडे, विक्रम कदम, गौतम जाधव, कुणाल शिंदे, धनराज त्रिगुळे, दादाराव बोबडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

 


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *