महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट च्या वतीने सर्व धर्मीय रोजा इफ्तार कार्यक्रम उत्साहात संपन्न.
पवित्र रमजान महिन्या निमित्त महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेच्या वतीने पुणे कॅम्प येथील बॉम्बे गॅरेज शेजारी विरवानी प्लाझा मध्ये सर्व धर्मीय रोजा इफ्तार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर यांनी केले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे. काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन दादा जोशी. काँग्रेसचे N.U.C.I. प्रदेश माजी अध्यक्ष आमिर शेख. नगरसेवक रफिक शेख. अविनाश बागवे. प्राचीताई आल्हाट. अक्रम मदारी. राजेंद्रसिंह वालिया. खाजाभाई पठाण. इरफान शेख. महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट प्रदेश युवक अध्यक्ष नाहीद मुजावर. महबूब नदाफ. एजाज सय्यद. मुश्ताक जिक्रे. हमीद काझी. जाकलिन फॉरेस्ट. क्रिस्ति अण्णा. मोनी सिंग. अकबर सर. इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी समाजातील एकोपा. बंधुता. आणि शांततेचा संदेश देण्यात आला. उपस्थितांना खजूर. फळे. आणि विविध खाद्यपदार्थ देऊन रोजा सोडण्यात आला. त्यानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजन केले होते.

संपादक : नागेश देडे





