सामाजिक

शिव स्वराज्य प्रेरणा पुरस्काराने समाजसेवक श्री. प्रदीप रावते यांचा सन्मान” पुणे : समाजातील विविध क्षेत्रांमध्ये


पुणे : समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक श्री. प्रदीप रावते यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे “शिव स्वराज्य प्रेरणा पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यवादी विचारसरणीने प्रेरित होऊन समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.

श्री. रावते यांनी महिला सशक्तीकरण, क्रीडा, कला, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने सामाजिक कार्य केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येण्यास मदत झाली असून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.   समाजहितासाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे त्यांना “शिव स्वराज्य प्रेरणा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *