जागतिक एड्स दिनानिमित्त पुणे जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन
विश्रांतवाडी – जागतिक एड्स दिनानिमित्त गेल्या १८ वर्षांपासून सातत्याने जनजागृती उपक्रम राबवणाऱ्या पुणे जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे यंदाही एड्स जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. कळस – विश्रांतवाडी परिसरातील पुणे महापालिका आणि खासगी शाळांच्या सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.
रॅलीचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर चकोर यांच्या हस्ते करण्यात आले. येरवडा-विश्रांतवाडी परिसरात सध्या प्रकल्प विभागामार्फत उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्यामुळे यावर्षीची रॅली कळस गावातून काढण्यात आली.
रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी एड्सविषयक जनजागृती संदेश देत समाजातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाला मा. नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे, सामाजिक कार्यकर्ते शशी आण्णा टिंगरे, मुख्याध्यापक अनिल टिंगरे, तसेच संजय लोहोट, राहुल शेडगे, संस्थेचे अध्यक्ष शशिकांत साटोटे, सचिव संजय घावटे, संचालक दिपक चावरिया, सुधीर पालकर, नितीन बर्गे, गणेश पाटील, राजेश अडसूळ, प्रकाश निकम, अमित गायकवाड, जया मुकनाक, गणेश बावणे, अन्वर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
सहभागी शाळा
ट्रिनिटी हायस्कूल
एम.जी.एम. हायस्कूल
आर. अँड डी. हायस्कूल
डॉ. नानासाहेब पुरूळेकर विद्यालय
गेणबा सोपानराव मोझे विद्यालय
विद्यानगर विद्यालय
नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय
येरवडा शाळा
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश बावणे, अन्वर शेख आणि अनंत मोरे यांनी परिश्रम घेतले.
सुत्रसंचलन दिपक चावरिया यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष शशिकांत साटोटे यांनी मानले.ही रॅली विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देत एड्सबाबत योग्य माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रभावी प्रयत्न ठरला.

संपादक : नागेश देडे





