सामाजिक

जीवन ज्योती प्रतिष्ठानतर्फे संविधान दिन उत्साहात साजरा


पुणे : जीवन ज्योती प्रतिष्ठान यांच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या औचित्याने जनता हायस्कूल (प्राथमिक व माध्यमिक), तसेच मनपा शाळा क्रमांक ८४ मुलींची येथे विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रती देऊन त्यांचा आणि मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना जितेंद्र जगताप म्हणाले, “विद्यार्थी शालेय जीवनात असतानाच संविधानातील हक्क, मूलभूत सुविधा याबाबतची शिक्षण देणे अत्यावश्यक आहे. फक्त संविधानाची प्रत मिळून उपयोग नाही; पूर्ण संविधान शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झाले पाहिजे, जेणेकरून कोणताही घटक वंचित राहणार नाही आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आपले हक्क कळतील.”
कार्यक्रमास जनता प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकांत वैरागर, तसेच प्रमोद जाधवर, रमेश घोडेकर, उमेश गोंजारी, सुवर्णा भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
मनपा शाळा क्रमांक ८४ मुलींची येथील मुख्याध्यापक संदीप खिल्लारी, तसेच दिपाली मासळकर, वर्षा जोशी, श्वेता बर्वे, निलिमा चव्हाण, संतोष पिल्ले यांसह अनेक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवन ज्योती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र कराळेकर, दीपक गायकवाड, जितेंद्र जगताप, गोपाल पाटील, विनोद गायकवाड, यांसह प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *