भीमनगर, विश्रांतवाडी येथे अखेर लोडशेडिंगचा अंत – नागरिकांचा दिलासा
पुणे प्रतिनिधी :-
विश्रांतवाडी परिसरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून भेडसावत असलेली लोड शेडिंग व कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या अखेर सुटली आहे. वीज वितरण विभागाच्या सहकार्याने नवीन लोड शेडिंग लाईट केबलचे काम पूर्ण करण्यात आले असून, परिसरातील वीजपुरवठा आता पूर्णपणे सुरळीत झाला आहे.
.
गेल्या काही महिन्यांपासून भीमनगर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. व्यापारी वर्ग, विद्यार्थी आणि वृद्धांना मोठा त्रास होत होता. या समस्येचे गांभीर्य ओळखून भीम ज्योत तरुण मंडळ ने पुढाकार घेतला. मंडळाचे अध्यक्ष विशाल भोसले यांनी सतत पाठपुरावा करून संबंधित विभागाशी संवाद साधला. अखेर, दोन स्वतंत्र लोड विभागणी करून वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली.
विशाल भोसले म्हणाले,
भीमनगरातील सर्व नागरिकांना अखंड व स्थिर वीजपुरवठा मिळावा हा आमचा उद्देश होता. नागरिकांच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या तातडीच्या प्रतिसादामुळे हे काम वेळेत पूर्ण झाले. आता परिसरातील लाइट समस्या पूर्णपणे दूर झाली आहे.
नवीन केबल बसवण्याचे आणि लोड विभागणीचे हे काम पूर्ण झाल्यानंतर, परिसरातील सर्व घरांमध्ये नियमित प्रकाशपुरवठा सुरू झाला आहे. नागरिकांनी या बदलाचे स्वागत करत भीम ज्योत तरुण मंडळाचे आभार मानले आहेत.स्थानिक रहिवासी सांगतात की, यापूर्वी वारंवार येणाऱ्या विजेच्या समस्येमुळे घरगुती उपकरणे खराब होण्याचे प्रकार वाढले होते. मात्र, आता स्थिती पूर्णपणे सुधारली आहे.या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल मंडळाचे अध्यक्ष विशाल भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) पुणे शहर चे नेतृत्व आणि स्थानिक अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत.
आपले विश्वासू
भीम ज्योत तरुण मंडळ, भीमनगर, विश्रांतवाडी
अध्यक्ष – विशाल भोसले
सरचिटणीस – पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)

संपादक : नागेश देडे





