भीम जयंती उत्साहात साजरी
१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धम्म क्रांती बौद्ध विहार येथे धम्म क्रांती बौद्ध कमिटीच्या वतीने भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादनाने करण्यात आली. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर लहान उपासक व उपासिकांनी सामुहिक बुद्ध वंदना सादर करून कार्यक्रमाला प्रेरणादायी सुरुवात केली.
यावेळी प्रमुख उपस्थित कमिटीच्या अध्यक्षा आयु. मैनाताई गायकवाड, मा. विनोद भाऊ गायकवाड, बौद्धाचार्य मा. संतोष पिल्ले (गुरुजी) यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थित बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
वक्त्यांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांचे कार्य, त्याग आणि समाजासाठी दिलेले योगदान यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास परिसरातील अनेक बांधव, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. सुरेश किर्ते यांनी केले. शेवटी सर्व उपस्थितांना खाऊचे वाटप करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमास पुढील बांधव उपस्थित होते : मा. धम्मपाल तरकसे, मा. अमोल शिंदे, मा. संतोष यशवंते, मा. गोविंद मस्के, मा. अंबादास दहिरे, मा. रमेश चव्हाण, मा. सुनील उजगरे . मा.गौतम पंडागळे, मा. विजय जोगदंड, मा. हनुमंत गायकवाड, मा. विलास तरकसे, मा. सागर तरकसे, आयु. गवळणताई उजगरे, आयु. नमाताई घोडके . आयु. कांता राउत, आयु. उषा गायकवाड, आयु. मधुबाई गायकवाड, आयु. अनिता किर्ते, आयु. सुमनताई कांबळे , आयु. आशाताई गायकवाड तसेच गौतमभाऊ राउत.
यावेळी विहाराच्या संपूर्ण सजावटीचे काम मा. धम्मपाल तरकसे, राजू राऊत आणि मा. संतोष पिल्ले

संपादक : नागेश देडे





