सामाजिक

रात्री उशिरा प्रभाग क्र. १ मधील रस्त्याची दुरुस्ती; धनंजयभाऊ जाधव फाऊंडेशनचा पाठपुरावा यशस्वी


पुणे: आज मध्यरात्री ३ वाजता प्रभाग क्र. १ मधील पोरवाल रोड येथे पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. वाहतुकीच्या मोठ्या प्रमाणामुळे दिवसा काम करणे अशक्य असल्याने हे काम रात्री उशिरा पार पडले.

 

धनंजयभाऊ जाधव फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. पुजाताई धनंजय जाधव यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मनपा अधिकाऱ्यांशी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून नागरिकांकडून या कामाचे स्वागत करण्यात येत आहे.

 

फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रभागातील इतर रस्त्यांचीही लवकरच डागडुजी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *