मनोरंजन

अवनी आवास सोसायटीत कन्या पूजन सोहळा उत्साहात साजरा


पुणे काळजेवाडी, चऱ्होली –

रोजी अवनी आवास सोसायटी मध्ये कन्या पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळपासूनच संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व नियोजन, तयारी व आयोजन सोसायटीतील महिलांनी एकत्रितपणे केले. त्यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व पारंपरिक पद्धतीने पार पडला.

कार्यक्रमासाठी खास आकर्षण म्हणजे सर्व लहान मुली देवीच्या वेशभूषेत सजून आल्या होत्या. लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाच्या पारंपरिक साड्या, लेहेंगा-चोळी तसेच दागिन्यांनी सजलेल्या मुलींनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. छोट्या-छोट्या देवींच्या रूपात त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

पूजनाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. त्यानंतर मुलींचे पाय धुऊन त्यांना फुलं, अक्षता व नैवेद्य अर्पण करण्यात आला. प्रसादाचे वाटप करताना वातावरणात भक्तीभाव आणि कौटुंबिक ऐक्य जाणवत होते.

सोसायटीचे अध्यक्ष व समिती सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व महिलांचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी असेही सांगितले की अशा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजात ऐक्य, बंधुभाव आणि परंपरा जपण्याची प्रेरणा मिळते.

शेवटी मुलींना भेटवस्तू आणि मिठाई देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *