सामाजिक

विश्रांतवाडी : उड्डाण पुलाच्या कामामुळे वाहतूक विस्कळीत; त्रस्त नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल, रस्त्यावर उतरून निदर्शने


विश्रांतवाडी परिसरात सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना तसेच भीमनगर येथील विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कामादरम्यान टिंगरे नगर रोडला आडवे करून टँकर व इतर वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प होते.

यामुळे शाळा–कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज उशीर होतो, तर कामावर जाणाऱ्या नागरिकांना दररोजचा जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला अनेक वेळा तक्रारी व विनंत्या करूनही कोणतीही सुधारणा झाली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रशासनाकडून योग्य नियोजनाचा अभाव असल्याने परिसरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

अखेरीस सततच्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

“काम सुरू असले तरी आमच्या दैनंदिन जगण्याचा प्रश्‍न का निर्माण केला जात आहे?” असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

 


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *