क्राईम

येरवडा पोलिसांची धडक कारवाई : अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडून ₹20.70 लाखांचा गुटखा जप्त


पुणे : येरवडा परिसरात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेदरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत ₹20,70,500/- किंमतीचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांचा प्रचंड साठा जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी ही कारवाई केली.

दि. 24 नोव्हेंबर 2025 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मोहिम राबवित असताना पथकाला नाईक नगर, येरवडा येथील वेद प्रोव्हिजन स्टोअर्स मागील गोडाऊनमध्ये गुटखा साठवला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून आरोपी जमनाराम उर्फ गणेश बलराम जाट (वय 25) याला ताब्यात घेण्यात आले.गोडाऊनमधून विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ असा ₹20.70 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाईत सहभागी अधिकारी,पोलीस निरीक्षक : सुदर्शन गायकवाड,सहायक पोलीस निरीक्षक : नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार : राजस शेख, संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे,सुनील महाडीक, ऋषीकेश ताकवणे, संदीप देवकाते, गणेश गोसावी,देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, शुभांगी म्हाळसेकर,,गुन्हा कोणत्या कलमांखाली नोंदविला?

आरोपीवर खालील कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे :

भारतीय न्याय संहिता : कलम 123, 223, 274, 275

COTPA कायदा 2003 : कलम 7(2), 20(2)

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 : कलम 26(2)(i)(iv)त्यानुसार कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल

पोलिसांचा पुढील तपास गुटखा साठवणूक, पुरवठा साखळी आणि वितरण नेटवर्क याबाबत पुढील तपास येरवडा पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.या कारवाईमुळे परिसरातील गुटखा तस्करीला मोठा आळा बसला आहे.

 


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *