क्राईम

चालकानेच मालकाच्या आईचे दागिने लंपास; १५ लाखांचे सोने पोलिसांनी केले हस्तगत


पुणे | प्रतिनिधी

विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत घरातील विश्वासू चालकानेच मालकाच्या आईचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तत्पर कारवाई करत तब्बल १५ लाख रुपयांचे सोने हस्तगत केले आहे.

दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी फिर्यादी यांनी घरातील आईचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नं. २२३/२०२६ भा.न्या.सं.क. ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना घरात काम करणाऱ्या चालकावर संशय आला. त्यानुसार आरोपी राजेश परशुराम कांबळे (वय ४०, रा. लोहगाव) याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेले दागिने वितळवून सोन्याची लगड तयार केल्याचे उघड झाले. पोलिसांनी ही लगड जप्त केली असून तिची किंमत सुमारे १५ लाख रुपये आहे.

ही कारवाई मनोज पाटील, सोमय मुंडे आणि नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, तसेच अंमलदार लालु कन्हे, अंकुश जोगदंडे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, हरीप्रसाद पुंडे व प्रशांत सुतार यांचा समावेश होता.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *