तडीपार असूनही हद्दीत फिरताना पकडला! खंडणी विरोधी पथक–2 ची धडक कारवाई, रवी काते जेरबंद
पुणे : प्रतिनिधी
परिमंडळ 4 हद्दीत गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खंडणी विरोधी पथक–2 कडून सुरू असलेल्या विशेष कारवाई दरम्यान आज दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी मोठी धडक कारवाई करण्यात आली. पेट्रोलिंगदरम्यान पोलीस हवालदार सुजित वाघमारे व आदिनाथ येडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली.
माहितीनुसार, विमानतळ पोलीस ठाण्यातील तडीपार आरोपी रवी लक्ष्मण काते (वय 32, रा. सम्राट चौक) हा प्रतिबंधित हद्दीत परत आल्यानंतर यमुना नगर, लेन क्रमांक 12 येथे आढळून येत असल्याची खबर मिळाली होती. तत्काळ पथकाने त्या ठिकाणी धाड टाकत आरोपीला वेगवान कारवाईत जेरबंद केले.
तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपीवर मुंबई पोलीस ॲक्ट कलम 142 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन वरशा देशमुख, खंडणी विरोधी पथक–02, गुन्हे शाखा पुणे शहर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
पुणे शहरात तडीपार आरोपींवर होणारी ही कारवाई पोलिसांचे वाढलेले सतर्कता व मजबुत पाळत याचे द्योतक ठरले आहे.

संपादक : नागेश देडे





