क्राईम

विमानतळ पोलिसांची मोठी कामगिरी! १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, तिघे सराईत चोरटे जेरबंद


पुणे (प्रतिनिधी) – विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या तपास पथकाने घरफोडी करून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांकडून तब्बल १४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदर प्रकरणात गुन्हा रजिस्टर नंबर ४६५/२०२५, भा. दं. सं. कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) प्रमाणे दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी यांचे घराचे कुलूप तोडून अज्ञात आरोपींनी ९ तोळे सोन्याचे दागिने व दोन लॅपटॉप असा मुद्देमाल चोरी केला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील १४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून तीन संशयित आरोपींचा शोध घेऊन दोन जणांना अटक करण्यात आली.

अटक आरोपींची नावे:

१. जय संजय मोहिते (२२, रा. महादेव नगर, भोसरी)

२. आकाश सुधीर साळवी (२३, रा. गायकवाड नगर, दिघी)

त्यांच्या चौकशीतून तिसरा आरोपी शुभम अशोक मडीवाळ (२०, रा. गोंधळेनगर, हडपसर) याचे नाव समोर आले. पोलिसांनी गोपनीय माहितीनुसार त्यालाही ६ ऑक्टोबर २०२५ रोजी अटक केली.

तपासादरम्यान आरोपींकडून ११ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि ३ लाख रुपये किंमतीचे दोन लॅपटॉप असा एकूण १४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मा. श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परि. ४) मा. श्री. सोमय मुंडे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) मा. सौ. प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, गुन्हे शाखा निरीक्षक शरद शेळके यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.

या कारवाईत पो.उ.नि. मनोज बरुरे, पोलीस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालू क-हे, सचिन मांजरे, रुपेश पिसाळ, दादासाहेब बर्ड, हरीप्रसाद पुंडे, शैलेश नाईक, अंकुश जोगदंडे, राकेश चांदेकर, गणेश इथापे, सागर कासार, पांडुरंग म्हस्के, सना शेख यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

 

 

 


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *