सामाजिक

आनंदी जीवन फाउंडेशन’तर्फे 100 झाडांचे वृक्षारोपण


पुणे प्रतिनिधी शंकर जोग

झाडे लावा – झाडे जगवा’ तसेच एक लक्ष्य : एक लाख वृक्ष या उपक्रमाच्या अनुषंगाने आनंदी जीवन फाउंडेशनच्या वतीने मदत हॉस्पिटल आणि मदत वृद्धाश्रम परिसरात तब्बल 100 विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. चिकू, आंबा, जांभूळ, लिंबू आदी विविध फळझाडांचा यामध्ये समावेश होता.

या उपक्रमाचे आयोजन आनंदी जीवन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहसीन पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमावेळी फाउंडेशनचे सचिव आसिफ शेख, खजिनदार नूर मोहम्मद पठाण, तरन्नुम पठाण, सारिका भुजबळ, बजरंग राऊत, अण्णा चव्हाण, भरत सुरवसे, साहिल पठाण, आबा सोनवणे, काळूराम शेंडगे, शबनम शेख, दौलत ठोंबरे, संतोष आखाडे, मयूर आखाडे, ऋषिकेश राजवाडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. मोहसीन पठाण म्हणाले की, “फाउंडेशनतर्फे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. मोफत रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी व चष्मे वाटप, महिलांसाठी ‘सुपर होम मिनिस्टर – पैठणी’ स्पर्धा, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच गोरगरिबांसाठी अन्नदान कार्यक्रम अशा अनेक उपक्रमांद्वारे समाजसेवा केली जाते.”

परिसरात हिरवाई वाढविण्यासाठी आयोजित केलेला हा उपक्रम स्थानिक पातळीवर कौतुकास्पद ठरला.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *