लहुजी वस्ताद साळते जयंतीनिमित्त ‘भारतीय बहुजन पक्ष’ स्थापनेची घोषणा
लहुजी वस्ताद साळते यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बहुजन पक्षाची स्थापना जाहीर करण्यात आली आहे. शोषित, दलित, वंचित आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी कार्य करणारा हा नवा राजकीय पर्याय म्हणून पक्षाची मांडणी करण्यात आली आहे.
पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ थोरात, राष्ट्रीय अध्यक्ष अभिमान कांबळे आणि प्रदेशाध्यक्ष योगेश लोढे यांनी संयुक्तपणे ही घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आण्णा भाऊ साठे यांचे विचार तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहू, अशी ग्वाही तीनही नेत्यांनी दिली.
भारतीय बहुजन पक्षाने सामाजिक न्याय, समानता आणि स्वाभिमानाच्या ध्येयासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

संपादक : नागेश देडे





