सामाजिक

रिपब्लिकन कामगार सेनेच्या 13 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.


पुणे प्रतिनिधी शंकर जोग.

रिपब्लिकन कामगार सेनेचा 13 वा वर्धापन दिन, संघटना बांधणी व पदाधिकारी बैठक पुणे कॅम्प येथील शासकीय विश्रामगृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

राज्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाने रिपब्लिकन कामगार सेना ही कामगारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर आवाज उचलून त्यांना न्याय देण्याचे काम करते. महाराष्ट्रात रिपब्लिकन कामगार सेना वाढविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे व संघटना मजबूत करून कामगारांच्या न्याय हिताचे काम करावे आणि पुढील सहा महिने संघटना बांधणीसाठी सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात येणार आहे असे आव्हान रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष युवराज बनसोडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिली.

यावेळी रिपब्लिकन सेना या पक्षाचे राज्याचे विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष विवेक बनसोडे, रिपब्लिकन सेना पक्षाचे पुणे शहराध्यक्ष हनुमंत पपुल, राज्याचे उपाध्यक्ष विनय पांडे, राज्याचे सचिव अरविंद पांडे, पुणे शहर युवक अध्यक्ष अजयभाल शंकर, अरबाज पठाण,जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, विनोद सोनवणे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, भीमराव सोनवणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सागर कोळी, विशाल कांबळे, भारत गडेवार, वाल्मीक लोखंडे, विशाल बागुल, आकाश गायकवाड, अमित खलसे, खंडू शेंडगे, सोनू घोडके, हनुमंत वाघमारे, शांताराम दाभाडे, सुरज भालेराव, दत्ता शेंडगे, आदी उपस्थित होते,


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *