ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने उभारलेले पुणे महानगरपालिकेचे स्मारक आज अत्यंत दुर्दशाग्रस्त अवस्थेत दिसून येत आहे.
पुणे: प्रतिनिधी
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने उभारलेले पुणे महानगरपालिकेचे स्मारक आज अत्यंत दुर्दशाग्रस्त अवस्थेत दिसून येत आहे.

या ठिकाणी गुटखा खाऊन पिचकारी मारल्याचे डाग सर्वत्र दिसत असून, स्मारकाच्या सभागृहातील झुंबर तुटलेले आहे.

परिसरात वेस्टीज फर्निचर फेकून ठेवलेले असून पायऱ्यांच्या फरशा तुटलेल्या अवस्थेत आहेत.
सर्वात धक्कादायक म्हणजे — दिवसा देखील परिसरा मधले दिवे सुरू ठेवले जात आहेत, काही दिवे तुटलेले आहेत, तर काही वाया जात आहेत.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “महानगरपालिकेचे अधिकारी आणि नेमलेले कर्मचारी ठिकाणी उपस्थित असतानाही दुर्लक्ष का केले जात आहे?” असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव असलेल्या या स्मारकाची अशी दुरवस्था पाहून अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक संतप्त झाले आहेत.
“अधिकाऱ्यांचा वचक आहे की नाही?” असा सवाल परिसरातून करण्यात येत आहे.

संपादक : नागेश देडे





