महत्त्वाचे

येरवडा पोस्ट ऑफिस परिसरातील अतिक्रमणावर कारवाईची मागणी


पुणे प्रतिनिधी :येरवडा पोस्ट ऑफिसच्या बाजूलाअसलेल्या “सैराट मिसळ हाऊस” या हॉटेलने मंजूर जागेपेक्षा अधिक क्षेत्रावर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर हॉटेलसाठी केवळ १० बाय १२ फूट इतकी जागा मंजूर असताना, प्रत्यक्षात मंजूर क्षेत्रापेक्षा अधिक जागेवर अतिक्रमण करून व्यवसाय सुरू ठेवण्यात येत आहे. सार्वजनिक रस्ता व सरकारी जागेवर अडथळा निर्माण झाल्याने परिसरातील वाहतूक व पादचारी हालचालींवर परिणाम होत आहे.

सार्वजनिक जागेवरील हे अतिक्रमण तात्काळ हटवून संबंधित हॉटेल मालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *