राजकीय

प्रभाग एकच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे व चंद्रकांत टिंगरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुनःप्रवेश


पुणे प्रतिनिधी : शहरात  प्रभाग एक च्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे यांनी आज अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुनःप्रवेश जाहीर केला आहे.

स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या टिंगरे दाम्पत्याच्या या निर्णयामुळे प्रभाग एकमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात असून, आगामी महापालिका राजकारणाच्या दृष्टीनेही या घडामोडीकडे लक्ष वेधले जात आहे.

या पुनःप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, प्रभाग एकमध्ये पक्ष अधिक सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *