आमचा धनुष्यबाण ताणला की तो सुसाट सुटतो” – गोगावले यांचा विरोधकांना इशारा
राज्यातील राजकारण तापले असून भरत गोगावले यांनी जोरदार शब्दांत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
“आमचा धनुष्यबाण एकदा ताणला की तो थेट लक्ष्यावर जाऊन आदळतो,” असे ठाम विधान त्यांनी केले.
गोवले म्हणाले की, एकनाथ शिंदे हे प्रामाणिकपणे काम करणारे नेते असून त्यांच्या कार्यशैलीवर शंका घेण्याचे कारण नाही. अजित पवार हे अनेक वर्षे सत्तेत होते, तर देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले, हे सर्वांनाच माहीत आहे.
मात्र, ‘लाडकी बहीण योजना’ ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच सुरू करण्यात आली, हे वास्तव आहे. आज काही जण ही योजना आम्ही आणली असा दावा करत असतील, तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. “माझ्या लाडक्या बहिणीच सांगतील की ही योजना कोणी आणली. त्यामुळे सत्य स्वीकारा,” असे आवाहन भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

संपादक : नागेश देडे





