राजकीय

निवडणुकीपूर्वीच विकासाचा झपाटा : प्रभाग क्रमांक १ मध्ये सौ. पूजा धनंजय जाधव यांचे भरीव काम


पुणे :विश्रांतवाडी

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवण्यापूर्वीच प्रत्यक्ष विकासकामे सुरू करणाऱ्या सौ. पूजा धनंजय जाधव या प्रभाग क्रमांक १ मधील एकमेव उमेदवार ठरत असून, त्यांच्या कार्यपद्धतीची नागरिकांमध्ये मोठी चर्चा होत आहे.

प्रभाग क्रमांक १ (कळस–धानोरी–लोहगाव) परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सौ. पूजा धनंजय जाधव यांनी महाराष्ट्र शासनाच्या विशेष तरतूद निधीतून तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून, संबंधित विकासकामांचा शुभारंभही करण्यात आला आहे.

पुढील १० दिवसांत सर्व कामे पूर्ण होतील, अशी ग्वाही त्यांनी मतदारांना दिली आहे.

विशेष म्हणजे या निधीतून होणारी विकासकामे प्रभागातील सर्व भागांमध्ये समान पद्धतीने राबवली जाणार आहेत. या मध्ये खंडोबा माळ, लोहगाव मुख्य चौक, एम. डी. मोझे पेट्रोल पंप परिसर, धानोरी जकात नाका, धानोरी गाव मुख्य रस्ता, भैरवनगर, मुंजाबावस्ती व कळस या भागांचा समावेश आहे.भव्य भूमिपूजन सोहळ्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रविवारी १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या भूमिपूजन कार्यक्रमास नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या वेळी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. बाप्पूसाहेब पठारे, माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी दादा टिंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ. पूजा धनंजय जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

नेत्यांकडून कार्याचे कौतुक

यावेळी बोलताना आमदार बाप्पूसाहेब पठारे म्हणाले,

“खंडोबा माळ परिसराच्या विकासासाठी पूजा जाधव व धनंजय जाधव यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. आगामी महापालिका निवडणुकीत नागरिकांनी केवळ आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तींनाच संधी द्यावी.

तर माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांनी सांगितले,

५० हून अधिक विकासकामांचे उद्घाटन करून पूजा व धनंजय जाधव यांनी समाजकार्याची तळमळ दाखवून दिली आहे. प्रभागातील नागरिकांनी आणि आपण सर्वांनी त्यांच्या कार्याचे नक्कीच कौतुक केले पाहिजे.”

या कार्यक्रमास अनेक सामाजिक, राजकीय कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणुकीपूर्वीच सुरू झालेल्या या विकासकामांमुळे प्रभाग क्रमांक १ मध्ये काम करणाऱ्या नेतृत्वाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *