राजकीय

विश्रांतवाडीमध्ये राजकीय भूकंप!राष्ट्रवादीच्या संगीता दांगट यांचा भाजपमध्ये धडाकेबाज प्रवेश; केंद्रीय मंत्री मोहोळ उपस्थित


विश्रांतवाडी : प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक एकमध्ये आज मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मुंजाबावस्ती व धानोरी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रभावी नेत्या सौ. संगीता संदीप दांगट यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून राजकीय समीकरणेच बदलून टाकली आहेत.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्याने प्रभागात मोठी चर्चा रंगली आहे. कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजी आणि उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.

मोहोळ यांनी दांगट यांचे पक्षात स्वागत करताना कहा

“दांगट परिवाराचा एसटी समाजासह इतर समाजात प्रभावी आणि दांडगा संपर्क आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे प्रभागातील भाजपचा पाया अधिक मजबूत होणार आहे. आगामी निवडणुकांत याचा निश्चित फायदा मिळेल.”

स्थानिक पातळीवर दांगट परिवाराचा सामाजिक व राजकीय प्रभाव मोठा असल्याने त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. प्रभागातील समीकरणे आता पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत असून भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

या कार्यक्रमाला खांदवे, मंगेश गोळे, मंडल अध्यक्ष संदीप मोझे, आदित्य खांदवे, सोमनाथ टिंगरे, कुणाल घरसुंद यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती होती.

प्रभागातील आगामी निवडणुका या प्रवेशामुळे अधिक रंगतदार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

 

 


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *