CONTACT USमहत्त्वाचे

येरवडा क्षेत्रीय कार्यालयात दुहेरी निकष? कर्मचाऱ्याच्या मुलावर तात्काळ कारवाई; मात्र वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जावयावर माया! नागरिक संतप्त; उप अभियंता नागटिळक यांची निलंबनासह चौकशी करण्याची मागणी**


येरवडा क्षेत्रीय कार्यालयात दुहेरी न

विश्रांतवाडी – प्रतिनिधी
येरवडा क्षेत्रीय कार्यालयात ठेकेदारीतील गैरव्यवहार, नातेसंबंधातील हितसंबंध आणि निवडकांवरच कारवाई या मुद्द्यांवरून गंभीर चर्चेला ऊत आला आहे. एका कर्मचाऱ्याच्या मुलाने त्याच कार्यालयात कामे मिळवल्याने झालेल्या वादानंतर महापालिका आयुक्तांनी विजेच्या वेगाने निर्णय घेत कर्मचाऱ्याची बदली केली आणि मुलाला देण्यात आलेली सर्व कामे रद्द केली. मात्र, त्याचवेळी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जावयावर मात्र कारवाईचा चारा देखील टाकला गेला नाही, असा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे.कर्मचाऱ्याचा मुलगा ठेकेदार — आयुक्तांचा ताडकन निर्णय महापालिकेतील एका मुकादम पदावर असलेल्या कर्मचाऱ्याच्या मुलाने वडील जिथे काम करतात, त्याच कार्यालयात ठेकेदारी घेतली. यातील सर्व फाईलकारभार वडिलांच्या हातात असल्याने संशय अधिक बळावला. प्रकरण आयुक्तांपुढे गेल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याची तात्काळ बदली करण्यात आली व ठेकेदार मुलाला मिळालेली सर्व कामे रद्द केली.
पण पुढचा खुलासा अधिक धक्कादायक — ‘जे.बी. चव्हाण’ना ९०% कामे ? या गोंधळात एक चिंताजनक बाब पुढे आली.ठेकेदार जे.बी. चव्हाण यांनी ४५% ते ५५% इतक्या अव्वाच्या-सव्वा कमी दरात येरवडा कार्यालयातील तब्बल ९०% कामे मिळवली असल्याची माहिती समोर आली आहे.इतक्या कमी दरात कामे परवडणे अशक्य असल्याने प्रश्नही उपस्थित होतो :
मग एवढ्या कमी टक्क्यांचे काम करताना दर्जात तडजोड होते का?
की काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून व्यवस्थापन केले जाते?
यावर अधिक भर म्हणजे—या ठेकेदाराने FDR आणि Bank Guarantee जमा न केल्याने सहाय्यक आयुक्तांनी नोटीस दिली होती.
मोहल्ला कमिटीच्या सदस्याने आंदोलन केल्यावर कामे रद्द करण्याचे पत्रही महापालिकेतून देण्यात आले.
परंतु… कामे खरोखर रद्द झालीत का? जावई–सासरे संबंधाने वाढला प्रश्नचिन्हांचा पाऊस
मिळालेल्या माहितीनुसार, कामे रद्द करण्याचा निर्णय फक्त कागदोपत्रीच थांबलेला दिसतो.
प्रत्यक्षात याच ठेकेदाराला पुन्हा काम करण्याचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
आणि त्यामागचा ‘गुढ’ संबंध हा चर्चेचा मुख्य विषय बनला आहे — उप अभियंता चंद्रसेन नागटिळक — आणि ठेकेदार जे.बी. चव्हाण यांच्यात ‘सासरे-जावई’ नाते!नागरिकांचा आरोप असा : नागटिळक यांनी दोनवेळा प्रभारी सहाय्यक क्षेत्रीय आयुक्त म्हणून काम केले.
सात वर्षांहून अधिक काळ येरवडा क्षेत्रीय कार्यालयात तळ ठोकून बसले.
मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार अधिकारी–कर्मचारी एका ठिकाणी ३ वर्षांपेक्षा जास्त राहू शकत नाहीत, तरीही नागटिळक यांची बदली रोखण्यात आली.
या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबंध निर्माण झाले, त्यामुळेच जावयाचे कामे रद्द न करण्यास ‘वरदहस्त’ मिळत असल्याचा संशय बळावत आहे.
नागरिकांची संतप्त मागणी :
नागटिळक यांना तातडीने निलंबित करा; स्वतंत्र चौकशी समिती नेमावी!
कारभारातील दुहेरी निकषांमुळे परिसरातील नागरिक संतापले आहेत.
सर्व नियम तोडून एका कर्मचाऱ्याच्या मुलावर कारवाई आणि दुसरीकडे अधिकाऱ्याच्या जावयावर कृपा, यामुळे महापालिकेची पारदर्शकता मोठ्या प्रश्नचिन्हाखाली आली आहे.नागरिकांची ठाम मागणी :
उप अभियंता चंद्रसेन नागटिळक यांना तात्काळ निलंबित करावे
संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी समिती नेमावी
नातेसंबंधातून मिळणारे हितसंबंध उघड करावेत
जे.बी. चव्हाण यांची सर्व कामे रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया सुरू करावी


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *