विश्रांतवाडीतील मुकुंदराव आंबेडकर चौकात पाणीपुरवठा पाईपलाइन दुरुस्ती व रस्ता डांबरीकरण
पुणे प्रतिनिधी:-पुणे शहर पूर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुनीलआण्णा टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा नेतृत्व रवीभाऊ टिंगरे यांच्या सहकार्याने आणि संजय (सायबु) चव्हाण यांच्या माध्यमातून २९ ऑक्टोबर रोजी विश्रांतवाडीतील मुकुंदराव आंबेडकर चौकात पाण्याची पाईप लाईन दुरुस्ती व रस्ता डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.
सदर चौकात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे दररोज पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत होती. तसेच चौकात खोल खड्डे पडल्याने नागरिक आणि दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक वेळा घसरून अपघात होण्याच्या घटना देखील घडल्या होत्या.या समस्येबाबत निखिलभाऊ हेंद्रे आणि योगेशभाऊ थोरात यांनी संजय (सायबु) चव्हाण यांच्याकडे तक्रार नोंदविल्यानंतर त्यांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाईप लाईन दुरुस्तीचे काम करून घेतले. त्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करून खड्डे बुजविण्यात आले.
या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईबद्दल परिसरातील नागरिकांनी सुनीलआण्णा टिंगरे, रवीभाऊ टिंगरे, आणि संजय (सायबु) चव्हाण यांचे मनःपूर्वक आभार मानले.

संपादक : नागेश देडे





