शिक्षण-प्रशिक्षण

प्रा. डॉ. सुनिल कांबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार*


पुणे, – शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात प्रा. डॉ. सुनिल नारायण कांबळे यांना “आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२५” प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे, मुंबई शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर व कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन डॉ. कांबळे यांचा गौरव करण्यात आला.

डॉ. कांबळे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेली नवनवीन प्रयोगशील कामगिरी उल्लेखनीय आहे. विज्ञान आणि कला यांची सांगड घालून अध्यापन करणे, नाट्यकलेचा वापर करून विज्ञानातील कठीण संकल्पना सुलभ करणे, ऑडिओ नोट्स प्रकल्प, तसेच दुर्लक्षित विद्यार्थ्यांसाठी सातत्याने घेतलेले प्रयत्न या उपक्रमांच्या आधारे त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. कांबळे म्हणाले –
“हा सन्मान माझ्या विद्यार्थ्यांचा व सहकाऱ्यांचा आहे. विज्ञान आणि कलेची सांगड घालून अध्यापन करणे हेच माझे ध्येय आहे. आगामी काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी अधिक जोमाने काम करीन.”


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *