दिव्यांगांच्या क्षमतांना नवी गती! शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका – येरवडा विभागातर्फे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम
पुणे प्रतिनिधी – शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका व समग्र शिक्षण अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन आणि समान संधी व समता सप्ताह साजरा करण्याच्या निमित्ताने येरवडा येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात दिव्यांग विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणादायी आदर्शांना अभिवादन करून
कार्यक्रमाची सुरुवात दिव्यांगांसाठी ज्ञानप्रकाश फाकणारे लुई ब्रेल आणि डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून झाली.
पर्यवेक्षिका सौ. अनिता वाघमारे यांनी प्रास्ताविकामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व सांगत, “प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अपार क्षमता दडलेली असते; योग्य प्रोत्साहन मिळाले तर ते समाजात आदर्श निर्माण करू शकतात,” असे मत व्यक्त केले.
दिव्यांगत्व म्हणजे संधी — सहाय्यक प्रशासकीय अधिकारी सौ. मंगल भोईर या प्रसंगी शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका, येरवडा विभागाच्या सहाय्यक प्रशासकीय अधिकारी सौ. मंगल भोईर उपस्थित होत्या.
त्यांनी आपल्या भाषणात दिव्यांगत्वावर मात करून जागतिक पातळीवर योगदान देणाऱ्या अनेक व्यक्तिमत्त्वांच्या प्रेरणादायी कथा सांगितल्या.त्यांनी पुढे सांगितले:
दिव्यांगत्व ही कमीपणा नसून एक संधी आहे. योग्य मार्गदर्शन, सकारात्मक दृष्टीकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर कुणीही उंच भरारी घेऊ शकतो.
विशेष शिक्षकांचा मार्गदर्शनाचा वर्षाव
कार्यक्रमात विशेष शिक्षकांनी विविध अंगांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले येल्लू कादरी मॅडम – “Disability ला Ability समजा” म्हणत विद्यार्थ्यांना नवऊर्जा दिली.
उमाकांत कांबळे सर – शासनाच्या विविध शैक्षणिक योजना, सवलती व सुविधा यांची माहिती दिली.
बाळासाहेब चोरघडे सर – थेरपी, परीक्षा सुविधा, सवलती याबाबत पालकांना सविस्तर मार्गदर्शन.
प्रतिभा पाटील मॅडम – दिव्यांगत्वावर मात केलेल्या यशस्वी व्यक्तींचा प्रभावी स्लाईड शो सादर.
सविता खांदवे मॅडम – संघर्ष आणि यशोगाथांद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
पालकांचे मनोगत: “समग्र शिक्षण विभागामुळे मुलांमध्ये झालेली प्रगती उल्लेखनीय”
विद्यार्थी सौरव पंडित व सुमेध गायकवाड यांच्या पालकांनी विशेष शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या मुलांमध्ये झालेली सकारात्मक प्रगती व्यक्त करत समग्र शिक्षण विभागाचे मनापासून आभार मानले.
कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पालक व विद्यार्थ्यांसाठी चहा-नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण टीमचा विशेष सहभागया उपक्रमाच्या यशामागे शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका – येरवडा विभागातील केंद्रस्तरीय विषय शिक्षक व विशेष शिक्षकांचा मोलाचा वाटा राहिला.
मीनाक्षी भावे, हेमलता फासगे, प्रतिभा पाटील, सविता खांदवे, येल्लू कादरी, उमाकांत कांबळे, बाळासाहेब चोरघडे या सहकाऱ्यांनी अपार परिश्रम घेऊन कार्यक्रम उत्तुंग यशस्वी केला.

संपादक : नागेश देडे





