शहीद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक विद्यालयाचा भव्य वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात
पुणे – येरवडा परिसरातील शैक्षणिक गुणवत्तेसाठी ओळखले जाणारे शहीद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक विद्यालय यावर्षीही आपल्या भव्य वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभाने उजाळून निघाले. १० वी व १२ वीचे सलग १००% निकाल देणाऱ्या या विद्यालयाची तळपती परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांच्या कला, गुण, आणि प्रतिभेला व्यासपीठ देण्यासाठी विविध सांस्कृतिक व स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या वर्षीचा समारंभ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे रंग मंदिर येथे दिमाखात पार पडला. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्रभागातील सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे आम आदमी पार्टीच्या महिला उपाध्यक्षा व येरवडा गांधी नगर प्रभागाच्या उमेदवार सौ. श्रद्धा मनोज शेट्टी यांच्या हस्ते गुणवान विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळवलेला सन्मान पाहून पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या भव्य सोहळ्याला दिशादर्शन व पाठिंबा देणारे मार्गदर्शक मा. श्री. एजाज भाई खान यांचे विद्यालय व्यवस्थापन आणि उपस्थित मान्यवरांनी मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगून गेले. विद्यालयाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध कार्यशैली आणि शिक्षकवर्गाची मेहनत यामुळे येरवडा परिसरात या शाळेने स्वतंत्र असा मानाचा ठसा उमटवला आहे.

संपादक : नागेश देडे





