शिक्षण-प्रशिक्षण

पिंपरी-चिंचवड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ‘सेल्फ स्वीपिंग मशीन’ प्रकल्पाला प्रथम क्रमांक


पिंपरी-चिंचवड :

आजचा दिवस हा विज्ञान शिक्षक व पालक या दोन्ही नात्यांनी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा असल्याची भावना प्रा. डॉ. सुनिल कांबळे यांनी व्यक्त केली. ५३ व्या पिंपरी-चिंचवड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्यांच्या मार्गदर्शनाखाली कु. संस्कृती सुनिल कांबळे व कु. प्रांजल परमेश्वर इंगळे यांनी सादर केलेल्या ‘Self Sweeping Machine’ या अभिनव प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला.

विज्ञानातील जिज्ञासा, तांत्रिक विचारशक्ती आणि प्रत्यक्ष प्रयोगशीलता यांचा सुंदर मिलाफ असलेल्या या प्रकल्पाचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले. तसेच याच विद्यार्थिनींनी प्रश्न मंजुषा (माध्यमिक गट) स्पर्धेतही तृतीय क्रमांक मिळवून शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवला.

या यशाबाबत बोलताना प्रा. डॉ. सुनिल कांबळे म्हणाले की, “एक शिक्षक म्हणून विद्यार्थिनींना योग्य दिशा देता आली आणि एक बाप म्हणून स्वतःच्या लेकीने मेहनत, चिकाटी व विज्ञानावरील प्रेमाच्या जोरावर हे यश मिळवले, याचा मनापासून अभिमान आहे. हे यश केवळ बक्षिसांचे नसून कष्ट, शिस्त, सातत्य आणि शिकण्याच्या प्रवासाचे फलित आहे.”

संस्कृती आणि प्रांजल यांच्या या घवघवीत यशाबद्दल शिक्षकवर्ग, पालक व शाळा व्यवस्थापनाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक व वैज्ञानिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *