देश-विदेश

संविधानाचे महत्व सांगत ‘संविधान दिन’ साजरा…


पुणे – देशाच्या लोकशाहीचा कणा असलेल्या भारतीय संविधानाच्या मूल्यांची जनजागृती ठेवण्याच्या उद्देशाने २६ नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील सर्व स्तरांतील लोकांना – व्यावसायिक चांभार, रिक्षाचालक, चहावाले, महिला व पुरुष सुरक्षा रक्षक, पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी, निवडणूक अधिकारी तसेच गॅरेज कामगार – यांना संविधानाची प्रास्ताविक प्रत भेट देत त्याचे महत्व समजावून सांगण्यात आले.

या उपक्रमात नागरिकांनी संविधानातील समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांची नवी जाण करून घेतली. समाजातील प्रत्येक घटकाला समानतेच्या धाग्यात बांधून ठेवणाऱ्या संविधानाची महती उपस्थितांना समजावून सांगण्यात आली.

आम आदमी पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहराध्यक्ष श्री. सुदर्शन जगदाळे यांनी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना संविधानाची प्रस्तावना भेट देत सामूहिक वाचनाचा कार्यक्रम घेतला. देशाच्या संविधानाबद्दल आदर, जागरूकता आणि कर्तव्यबोध निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरला.

कार्यक्रमाची संकल्पना व मांडणी विशाल भाऊ शेलार यांनी साकार केली. महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ. श्रद्धाताई शेट्टी आणि संघटन सहमंत्री श्री. मनोज शेट्टी यांनी कार्यक्रमाला कृतीशील दिशा देत यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

संविधान दिनानिमित्त घेतलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत लोकशाही बळकट करण्यासाठी अशा जनजागृती कार्यक्रमांची अत्यंत गरज असल्याचे मत व्यक्त केले.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *