आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब प्रेमी” या संकल्पनेअंतर्गत सामाजिक उपक्रम
पुणे :प्रतिनिधी
आम्ही फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब प्रेमी” या सामाजिक संकल्पनेचा प्रारंभ १२ डिसेंबर २०२५ रोजी शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या उपक्रमाची संकल्पना कु. पूजा विलास काटकर यांनी मांडली असून, त्यांना मा. रोहन पायगुडे, मा. असिफ भाई तांबोली व मा. शिवम काशीद यांनी सह-संकल्पक म्हणून साथ दिली आहे.
या संकल्पनेअंतर्गत “तीन उपक्रम – तीन सकारात्मक संदेश” हा उद्देश ठेवून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १३ डिसेंबर २०२५ रोजी गेनबा सोपान मोझे विद्यालय व सरस्वती विद्यामंदिर, टिंगरेनगर येथे उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
या वेळी आंब्याच्या झाडाचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांसाठी मेंटल हेल्थ अवेअरनेस (मानसिक आरोग्य जनजागृती) विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याच कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक मा. राहुल क्षीरसागर सर यांचा सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संरक्षण आणि मानसिक आरोग्याविषयी जागृती या तीन सकारात्मक मूल्यांचा संगम साधणारी ही संकल्पना समाजात निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

संपादक : नागेश देडे





