सामाजिक

लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम साहेब यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव


पुणे प्रतिनिधी:लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम साहेब यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी लहुजी शक्ती सेना, पुणे शहर युवक अध्यक्ष आकाश बबन वायदंडे, पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कैलास अडसूळ, सामाजिक कार्यकर्ते विजय शंकर वंजारे तसेच जुबेर पटेल यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कायद्याची अंमलबजावणी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी केलेले प्रयत्न आणि पोलीस प्रशासनाच्या प्रभावी कामगिरीबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यातही अशाच प्रकारे जनतेच्या सेवेसाठी कार्य करत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *