आरोग्य

राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा येथे अत्याधुनिक तपासणी सुविधा अल्पदरात उपलब्ध


पुणे, येरवडा : सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी येरवडा येथील राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय तपासणी सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक रवी टिंगरे यांनी हॉस्पिटलमधील **“भारक्त डायग्नोस्टिक सेंटर”**ला सदिच्छा भेट देत रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आरोग्यसेवा अधिक सक्षम व सुलभ करण्याबाबत सकारात्मक संवाद साधण्यात आला.

पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या केंद्रात नागरिकांसाठी अत्याधुनिक तपासणी सुविधा अत्यंत अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात प्रमुखतः –

एमआरआय (MRI)

सीटी स्कॅन (CT Scan)

यूएसजी / सोनोग्राफी

एक्स-रे

रक्त तपासणी (Blood Tests)

या सुविधा नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत असल्याने पुणेकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरत आहे.

नगरसेवक रवी टिंगरे यांनी प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांसह सर्व पुणेकरांना या अद्ययावत आणि माफक दरातील दर्जेदार आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *