नानासाहेब पुरुळेकर ट्रान्सफॉर्मर परिसरात चेंबर फुटले; दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढले, नागरिक हैराण
पुणे (प्रतिनिधी):नानासाहेब पुरुळेकर ट्रान्सफॉर्मर कोटीच्या बाजूला असलेले चेंबर आणि ड्रेनेज लाईन गेल्या काही दिवसांपासून फुटले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात घाण पाणी साचले असून तीव्र दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून परिसरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
सदर ठिकाणी वीज ट्रान्सफॉर्मर असल्याने परिसरात नेहमीच हालचाल सुरू असते. घाण पाणी व चेंबरमधून बाहेर येणारी मलनिस्सारण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून नागरिकांना श्वास घेणेसुद्धा कठीण झाले आहे. परिसरातील लहान मुले, वृद्ध व आजारी नागरिकांना संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे की, महानगरपालिकेच्या पाणी व मलनिस्सारण विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम करून परिसराची स्वच्छता करावी आणि डास निर्मूलनाची प्रभावी मोहीम राबवावी, अन्यथा आरोग्यविषयक मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

संपादक : नागेश देडे





