सामाजिक

कंत्राटी सफाई कामगारांना दिवाळी बोनस देण्याची लहुजी शक्ती सेनेची महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन!


 

पुणे | प्रतिनिधी:
पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना अद्याप दिवाळी बोनस न मिळाल्याने लहुजी शक्ती सेनाच्या वतीने आज महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शेकडो कामगार आणि सेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
महापालिका आयुक्त कार्यालयाने परिपत्रक क्र. मआ/एल.ओ./४८४५, दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ नुसार, तसेच स्थायी समिती ठराव क्र. ७१९, दिनांक १० ऑक्टोबर २०२५ नुसार कंत्राटी सफाई कामगारांना दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने नाराज कामगारांनी लहुजी शक्ती सेनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले.
आंदोलनादरम्यान सेनेचे पदाधिकारी म्हणाले की,
“पुणे शहराच्या स्वच्छतेसाठी हे कामगार दररोज पहाटे अंधारात उठून काम करतात. दिवाळीसारख्या सणात त्यांना मिळणारा बोनस हा त्यांच्या श्रमांचा सन्मान आहे. हा बोनस देण्यात झालेला विलंब म्हणजे त्यांच्या सन्मानाचा अपमान आहे.”
लहुजी शक्ती सेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन देऊन सर्व क्षेत्रीय कार्यालयांना तातडीने आदेश जारी करून बोनसची रक्कम कामगारांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली.
कामगारांच्या मेहनतीचा सन्मान राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका सेनेने घेतली आहे.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *