सौ. लतिकाताई खंडागळे यांची भारतीय बहुजन पक्षाच्या महिला मुंबई प्रदेशाध्यक्षपदी निवड
मुंबई प्रतिनिधी : सामाजिक, राजकीय आणि लोककल्याणाच्या विविध उपक्रमांत सातत्याने योगदान देत समाजकार्याची भक्कम परंपरा जपणाऱ्या सौ. लतिकाताई खंडागळे यांची भारतीय बहुजन पक्षाच्या महिला मुंबई प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ थोरात, राष्ट्रीय अध्यक्ष अभिमान कांबळे, प्रदेशाध्यक्ष योगेश लोंढे, युवक प्रदेशाध्यक्ष बबन खुडे आणि महिला प्रदेशाध्यक्ष अंजलीताई लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
पक्षाचे ध्येय–धोरण, श्रम, बुद्धी, पैसा, कौशल्य व वरिष्ठांचे आदेश लक्षात घेऊन लतिकाताईंना व्यापक आणि सातत्यपूर्ण कामाची संधी देण्यात आली आहे. मुंबईसारख्या महत्वपूर्ण महानगरात पक्ष अधिकाधिक बळकट व्हावा, महिलांमध्ये जागृती वाढावी व सामाजिक चळवळींना गती मिळावी यासाठी हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
ही नियुक्ती सदर तारखेपासून एक वर्षांपर्यंत वैध राहणार असून, कोणताही फेरबदल करण्याचा अधिकार केंद्रीय कार्यकारिणीकडे असेल.
सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान
सौ. लतिकाताई खंडागळे यांनी सामाजिक व धार्मिक क्षेत्रात केलेल्या कामामुळे त्यांची ओळख सक्षम व कर्तृत्ववान समाजकार्यकर्ती अशी निर्माण झाली आहे.
त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून, त्यांना लोकनेते एकनाथ गायकवाड समाजभूषण पुरस्कार दिनांक 9 मे 2023 रोजी माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई एकनाथ गायकवाड यांच्या शुभहस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
त्यांनी आजवर अनेक लोकहितार्थ उपक्रम राबवले आहेत अनाथ आश्रमांना दान
महिलांसाठी बचत गट चालवणे
सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग
त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यास मदत झाली आहे.
पक्षात अशा कर्तृत्ववान व्यक्तीचे आगमन
सामाजिक भान, कार्याचा अनुभव आणि लोकहितासाठी झटणारी व्यक्ती म्हणून लतिकाताईंचे भारतीय बहुजन पक्षात आगमन हे पक्षासाठी अभिमानाची बाब आहे.
पक्षातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले असून आगामी कार्यकाळासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादक : नागेश देडे





