क्राईम

अहिल्यानगर सोनईत मातंग समाजातील युवकावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा जीवघेणा हल्ला


प्रतिनिधी :अहमदनगर

ठिकाण: सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मातंग समाजातील एका तरुणावर काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणावर केवळ त्याच्या जातीच्या नावाने अपमानास्पद वक्तव्य करत निर्दयपणे मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे, तर आरोपींनी त्याच्या तोंडावर मूत्रविसर्जन करून मानवी अस्मितेचा घोर अपमान केला.

हा प्रकार 19 ऑक्टोबर रोजी घडला असून, समाजात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पीडित तरुण आपल्या वज्रमुठीत हिंदुत्व घेऊन फिरणारा समाजाभिमानी युवक असल्याचे समजते. तरीही त्याच्यावर असा अमानुष हल्ला होणे हे प्रशासन व कायदा-सुव्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह ठरले आहे.

या प्रकरणातील आरोपींवर अत्याचार प्रतिबंधक कायदा (SC/ST Atrocities Act) तसेच गंभीर गुन्ह्यांच्या कलमानुसार तातडीने कारवाई करण्याची मागणी समाजातून होत आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून सुरक्षेचे कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

समाज नेते व संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत पीडित तरुणाला न्याय मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.

 


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *