राजकीय

फुलेनगर–नागपूरचाळ प्रभागातून महेश पाटील विजयाचा गुलाल उधळणारच


सोमनाथ साळुंके,/नागेश देडे

सामाजिक कार्यातून युवकांच्या मनावर राज्य करणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गटाचे शहर उपाध्यक्ष महेश पाटील यांनी आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २ (फुलेनगर–नागपूरचाळ) मधून रिंगणात उतरण्याची जय्यत तयारी केली आहे.

त्यांच्या मैदानात उतरण्याने विरोधकांमध्ये खळबळ उडाली असून, मतदारांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे – “या वेळी पाटील विरोधकांना कात्रजचा घाट दाखवणारच!”

फुलेनगर–नागपूरचाळ : प्रतिष्ठेची निवडणूक

गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर, या प्रभागात राजकीय वातावरण तापले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या तालमीत राजकारण शिकलेले महेश पाटील हे “खाणीतून सापडलेला हिरा” ठरत असून, पक्षासाठी आशेचा किरण ठरले आहेत.

समाजकारणातून राजकारणाकडे प्रवास

महेश पाटील यांनी राजकारणात येण्यापूर्वी समाजकारणाचा मजबूत पाया रचला.

गोरगरीब, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिलांच्या प्रश्नांवर काम करत त्यांनी ‘जनतेचा माणूस’ म्हणून ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेत अजित पवार यांनी स्वतः नागपूरचाळ येथील त्यांच्या कार्यालयाला भेट दिली, हे विशेषत्वाने नमूद करावे लागेल.

बेरोजगार युवकांसाठी माथाडी संघटनेचा पाया महेश पाटील यांनी युवकांसाठी रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले.

त्यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली माथाडी संघटना आज वटवृक्षासारखी वाढली असून, हजारो युवकांना रोजगार मिळवून दिला आहे.त्यामुळे त्यांना ‘तरुणांच्या रोजगाराचा आधारस्तंभ’ म्हणून ओळख मिळाली आहे.

महिलांसाठी रोजगार व बचतगट उपक्रम

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी त्यांनी महिला बचतगट उभारले असून, अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.त्यांच्या कामामुळे प्रभागातील महिला वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला आहे.

विकासकामांमुळे मिळवले लोकांचे प्रेम

माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील यांनी नागपूरचाळ–फुलेनगरमध्ये अनेक रखडलेली विकासकामे मार्गी लावली.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो वा नागरिकांच्या समस्या – पाटील नेहमीच लोकांसाठी रात्री-अपरात्री हजर असतात.त्यांच्या कार्यालयातून कोणीही व्यक्ती रिकामी परत जात नाही, अशी त्यांची ओळख आहे.विरोधकांमध्ये धास्ती, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह त्यांच्या या सक्रियतेमुळे विरोधकांच्या छातीत धडकी बसली आहे.

मतदारांमध्ये असा सूर ऐकू येतोय

या वेळी प्रभाग क्रमांक २ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा महेश पाटीलच फडकवणार!”

गुरूंचे मार्गदर्शन, जनतेचा आशीर्वाद

माथाडी कामगार संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन महेश पाटील यांनी कामकाजात परिपूर्णता आणली आहे.जनतेचा विश्वास, तरुणांचा उत्साह आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद या तिन्हींच्या बळावर महेश पाटील हे या प्रभागातून विजयाचा गुलाल उधळणार हे निश्चित दिसत आहे.

1. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांची भेट घेताना महेश पाटील

2. नागपूरचाळ प्रभागातील प्रलंबित कामांवर चर्चा करताना पाटील

3. पाटील यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या महादेव मंदिरात दर्शन घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार सुनील टिंगरे व महेश पाटील

 

 

 

 

 


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *